Join us  

WTC 25 Final Scenario : भारत ५ सामने जिंकून WTC Final खेळणार, पण समोर कोण असणार? जाणून घ्या समीकरण

भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गतवर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चषक उंचावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 2:18 PM

Open in App

Scenario required to reach WTC 25 Final -भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलमध्ये दोनवेळा धडक दिली, परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गतवर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चषक उंचावला. आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याची संधी आहे आणि त्यांना उर्वरित १० सामन्यांपैकी ५ सामने जिंकावे लागतील. पण, भारताच्या विरोधात कोण यासाठी जोरदार रस्सीखेच आहे. 

ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवून भारतीय संघाचा ताण वाढवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील कसोटी टीम इंडियाने इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला आणि २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. या निकालानंतर WTC 2023-25 गुणतालिकेतीवर नजर टाकल्यास, टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत केल्यानंतर ६८.५१ च्या विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. 

किवींविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाची विजयाची टक्केवारी ५९ होती, परंतु आता ती ६२.५० झाली  आहे. यासह ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला दुसऱ्या स्थानावरून मागे ढकलून भारताच्या जवळ पोहोचले आहेत. भारत पहिल्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाचे अव्वल स्थान मिळविण्याचे टेन्शन वाढवले ​​आहे. न्यूझीलंडनंतर ( ५० टक्के) बांगलादेश ( ५०) चौथ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान ३६.६६ विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.

जाणून घ्या सर्व संघांचे समीकरण

  • ऑस्ट्रेलिया - ७ पैकी ४ कसोटी जिंकाव्या लागतील ( उर्वरित सामने - ५ वि. भारत ( होम) व २ वि. श्रीलंका ( अवे) ) 
  • भारत - १० पैकी ५ कसोटीत विजय हवा ( उर्वरित सामने - २ वि. बांगलादेश ( होम), ३ वि. न्यूझीलंड ( होम) व ५ वि. ऑस्ट्रेलिया ( अवे))
  • दक्षिण आफ्रिका - ८ पैकी ७ कसोटीत विजय हवा ( उर्वरित सामने - २ वि. वेस्ट इंडिज ( अवे), २ वि. बांगलादेश ( अवे), २ वि. श्रीलंका ( होम), २ वि. पाकिस्तान ( होम)) 
  • न्यूझीलंड - ८ पैकी ६ कसोटीत विजय हवा ( २ वि. श्रीलंका ( अवे), ३ वि. न्यूझीलंड ( अवे), ३ वि. इंग्लंड ( होम)) 
  • पाकिस्तान - ९ पैकी ७ कसोटीत विजय आवश्यक ( २ वि. बांगलादेश ( होम), ३ वि. इंग्लंड ( होम), २ वि. दक्षिण आफ्रिका ( अवे), २ वि. वेस्ट इंडिज ( होम))
  • वेस्ट इंडिज - ९ पैकी ७ विजय गरजेचे
  • इंग्लंड - १२ पैकी १२ विजय महत्त्वाचे
  • बांगलादेश - १० पैकी ७ कसोटी सामने जिंकावे लागतील
  • श्रीलंका - ११ पैकी ८ सामने जिंकणे गरजेचे 
टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध पाकिस्तान