क्रिकेटरांची घर खूप महागडी आणि आलिशान असतात. जगभरात अनेक क्रिकेटर श्रीमंत आहेत. पण, क्रिकेटरांमधील जगातील सर्वात महागड घर भारतीय महिला क्रिकेटरचे आहे. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटचे दिग्गजच नाहीत तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्येही या महिला क्रिकेटरचा समावेश होतो. अनेक महागातल्या आलिशान कार, भव्य फार्महाऊस, आलिशान बंगले, महागडे फ्लॅट अशा या क्रिकेटपटूंची लक्झरी जीवनशैली पाहण्यासारखी आहे. ही महिला खेळाडू गुजरातची आहे, तिचे नाव मृदुला कुमारी जडेजा आहे.
डेव्हिड वॉर्नरची वन-डे क्रिकेटमधूनही निवृत्ती! नववर्षाच्या सुरुवातीलाच केली मोठी घोषणा
सर्वात महागड्या घरात राहणाऱ्या मृदुला जडेजाचे राजकोटमधील रणजीत विलास पॅलेस हे निवासस्थान आहे. मृदुला कुमारी जडेजा राजकोटच्या राजघराण्यातील आहे. २२५ एकर रणजित विलास पॅलेसचे सध्याचे मालक मंधातासिंह जडेजा हे मुदुलाचे वडील आहेत आणि ते राजकोटच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. गॉथिक कल्पित शैलीतील रणजीत विलास पॅलेसमध्ये १५० खोल्या आहेत. यात अनेक विंटेज लक्झरी कारसह एक अनमोल गॅरेज देखील आहे. हा राजवाडा भारतातील काही राजवाड्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये पूर्वीच्या राजघराण्यातील लोक अजूनही राहतात आणि हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित झालेले नाहीत.
मृदुला जडेजा तिच्या मोठ्या शाही निवासस्थानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या राजवाड्यात भारतातील सर्वात महागड्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रणजित विलास पॅलेसची किंमत अंदाजे ४,५०० कोटी रुपये होती, यामध्ये लेक फार्म, चांदीचा रथ, दागिने आणि अनेक विंटेज वाहने यांचा समावेश होता.
मृदुलाने सौराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. तिने महिला क्रिकेटरांच्या वेतन वाढीची मागणीही केली होती. गरिब कुटुंबातील क्रिकेटरांना मदत होईल असंही म्हटले होते. मृदुलाने सौराष्ट्र आणि पश्चिम विभागाकडून क्रिकेट खेळले आहे. तिने आपल्या कारकिर्दीत ४६ मर्यादित षटकांचे सामने, ३६ टी-20 आणि १ प्रथम श्रेणी सामना खेळली आहे. मृदुला राईट हॅन्ड बॅट्समन गोलंदाज आहे. तिने २०२१ मध्ये महिला सिनिअर वनडे ट्रॉफीमध्ये चार अर्धशतके झळकावली.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबईतील ५३ मजली टॉवरच्या २९व्या मजल्यावर ३० कोटी रुपयांच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. विराट कोहली आणि त्याची बॉलिवूड स्टार पत्नी अनुष्का शर्मा यांच्याकडे गुरुग्राममध्ये ८० कोटी रुपयांचा व्हिला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मुंबईतील वांद्रे येथे ८० कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहतो. सात एकरात पसरलेल्या धोनीच्या मोठ्या फार्म हाऊसचे सध्याचे बाजार मूल्य १० कोटी रुपये आहे.