Join us  

सोलापुरातील रणजी सामन्यात सौराष्ट्र संघाचा विजय; महाराष्ट्र संघाने केली निराशाजनक कामगिरी

सौराष्ट्र संघाच्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केल्यामुळे  एका पाठोपाठ एक महाराष्ट्र संघाचे खेळाडू तंबूत परतले.

By appasaheb.patil | Published: February 04, 2024 11:39 AM

Open in App

सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी सामन्यात सौराष्ट्र संघाने ४८ धावांनी महाराष्ट्र संघावर सहज विजय मिळविला. सामन्यात महाराष्ट्र संघाची निराशाजनक कामगिरी दिसून आली.

दरम्यान, सौराष्ट्र संघाचा दुसरा डाव ४३.२ षटकात १६४ धावांवर संपुष्टात आला. त्याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र संघाने शनिवारी दिवसा अखेर ५ बाद १०४ धावा केल्या होत्या. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र संघाचे फलंदाज मैदानात उतरले. दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना सुरू असतानाच सौराष्ट्र संघाच्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केल्यामुळे  एका पाठोपाठ एक महाराष्ट्र संघाचे खेळाडू तंबूत परतले.

महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदार जाधव यांनीही निराशाजनक कामगिरी केली, त्यामुळे सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघावर ४८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंच म्हणून वीरेंद्र शर्मा, रणजीव शर्मा तर मॅच रेफ्री म्हणून बाळकृष्ण मिस्किन यांनी काम पाहिले. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो सोलापूरकरांनी रणजी सामना पाहण्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर गर्दी केली होती.

टॅग्स :केदार जाधवसोलापूर