भारतीय क्रिकेटला धक्का; २९ वर्षीय अवि बरोतचे निधन, गुरुवारी पोस्ट केलेला सराव करतानाचा फोटो अन् शुक्रवारी घेतला जगाचा निरोप

सौराष्ट्र संघाचा यष्टिरक्षक अवी बरोत यानं शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. २९ वर्षीय अवीला हृदयविकाराचा झटका आला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:03 AM2021-10-16T11:03:34+5:302021-10-16T11:08:07+5:30

Saurashtra wicketkeeper Avi Barot passes away after cardiac arrest | भारतीय क्रिकेटला धक्का; २९ वर्षीय अवि बरोतचे निधन, गुरुवारी पोस्ट केलेला सराव करतानाचा फोटो अन् शुक्रवारी घेतला जगाचा निरोप

भारतीय क्रिकेटला धक्का; २९ वर्षीय अवि बरोतचे निधन, गुरुवारी पोस्ट केलेला सराव करतानाचा फोटो अन् शुक्रवारी घेतला जगाचा निरोप

Next

सौराष्ट्र संघाचा यष्टिरक्षक अवि बरोत यानं शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. २९ वर्षीय अवीला हृदयविकाराचा झटका आला. त्यानं २३ प्रथम श्रेणी, ३८ लिस्ट ए आणि २० ट्वेंटी-२० सामन्यांत सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०११मध्ये त्यानं पदार्पण केले आणि त्याच्या नावावर ३२०० धावा आहेत, त्यात २२ अर्धशतकं व दोन शतकांचा समावेश आहे. Saurashtra wicketkeeper Avi Barot passed away मार्च २०२१मध्ये पार पडलेल्या विजय  हजारे ट्रॉफीत दिल्लीविरुद्ध तो अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. त्यानं ८० झेल पकडले असून ७ स्टम्पिंग केल्या आहेत. अविनं गुरुवारी सराव करतानाचा फोटो इस्टाग्रावर पोस्ट केला होता आणि शुक्रवारी त्याच्या निधनाची बातमी समोर आली.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशननंही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ''सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येक सदस्याला धक्का बसला आहे. अवि बरोत हा सौराष्ट्रचा महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे. तो फक्त २९ वर्षांचा होता.''

दीड वर्षांपूर्वी रणजी करंडक स्पर्धेत बंगालविरुद्धच्या सामन्यात त्यानं महत्त्वाची खेळी केली होती. त्या स्पर्धेत त्यानं पाच सामन्यांत ३४.३३च्या सरासरीनं ३०९ धावा केल्या होत्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. ट्वेंटी-२०त तक्यानं १२२ धावा केल्या आहेत. अवि बरोत हा २०११मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार होता. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत गोवा संघाविरुद्ध ५३ चेंडूंत १२२ धावा कुटल्या होत्या आणि त्यात ११ चौकार व ७ षटकारांचा समावेश होता. 
 

Web Title: Saurashtra wicketkeeper Avi Barot passes away after cardiac arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app