लंडन : सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून पाकिस्तानचा संघ 5 ते 19 मे या कालावधीत येथे एक ट्वेंटी-20 व पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तानच्या संघाने सोमवारी नॉर्थम्टशायर क्लबविरुद्ध वन डे सराव सामना खेळला. त्यात पाकिस्तानने 8 विकेट राखून विजय मिळवला.
या सामन्यात असा एक प्रसंग घडला त्यात कर्णधार सर्फराजने सहकारी खेळाडू बाबर आझमला सामना सुरू असताना लाथ मारली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत यष्टिरक्षक करणाऱ्या सर्फराजने क्षेत्ररक्षण करत असताना आझमच्या जवळ येत त्याला लाथ मारताना दिसत आहे. पण, त्याने ही लाथ रागात मारली की मस्करीत हे कळत नाही.
पाकिस्तानी मीडियाने ही घटना हलक्यात घेतली. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना 31 मे रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.