पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद याने रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३८ वर्षीय विकेटकीपर-फलंदाज सरफराजने पाकिस्तानकडून २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात ५४ कसोटी, ११७ वनडे आणि ६१ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळत तीन्ही फॉर्मॅटमध्ये एकूण ६१६४ धावा केल्या. त्याच्या नावावर ६ शतके आणि ३५ अर्धशतकांची नोंद आहे. विकेटच्या मागे त्याने ३१५ झेलसह ५६ स्टम्पिंग केल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१०० सामन्यात कॅप्टन्सी आणि खास विक्रम
कराचीमध्ये जन्मलेल्या सरफराजने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि २०२३ मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला. सरफराजने सर्व फॉर्मॅटमध्ये मिळून १०० सामन्यांत पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केलं (५० वनडे, ३७ टी २०, १३ कसोटी). त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी झेप घेण्यासोबतच सलग ११ टी२० मालिका जिंकण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला होता.
कोणताही संघ संघटनेपेक्षा मोठा नसतो; ICC अध्यक्ष जय शाह यांचा पाकिस्तानसह बांगलादेशला टोला
त्याच्या वैयक्तिक विक्रमांबाबत बोलायचं तर, एका कसोटी सामन्यात १० झेल घेणारा तो एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे. त्याने २०१९ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. तसेच लॉर्ड्स मैदानावर वनडेत शतक करणारा तो पाकिस्तानचा एकमेव विकेटकीपर ठरला होता. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने हे विक्रमी शतक झळकावले होते.
भारताला दिला होता मोठा धक्का
२०१७ च्या हंगामात सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेतेपदाचा दुष्काळ संपवताना टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला १८० धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. द ओव्हल येथे खेळलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ४ बाद ३३८ धावा केल्यावर भारतीय संघ १५८ धावांत आटोपला होता.
या गोष्टीवरून झालेला ट्रोल
पाकिस्तानच्या संघाने २०१७ च्या विजयाची टीम अनेकदा वाजवली. पण त्यानंतर टीम इंडियाने प्रत्येक ICC स्पर्धेत पाकिस्तानची चांगलीच जिरवली. २०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एक पराभव वगळता टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध दबदबा राहिला. २०१९ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सरफराज अहमद भारताविरुद्धच्या सामन्यात जांभई देताना दिसला होता. यावरुन तो चांगलाच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले होते. या घटनेनंतर त्याला आळशी कॅप्टन असा टॅग लागला होता.
निवृत्तीनंतरची प्रतिक्रिया
निवृत्तीनंतर सरफराज म्हणाला, "पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान होता. २००६ मध्ये अंडर-१९ संघाला विश्वविजेता बनवण्यापासून ते २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यापर्यंत प्रत्येक क्षण खास होता. सर्व फॉर्मॅटमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व करणं म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. माझ्या नेतृत्वकाळात बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली यांसारख्या खेळाडूंना मॅच-विनर बनताना पाहणं माझ्यासाठी अभिमानाची बाब होती."
Web Summary : Sarfaraz Ahmed, Pakistan's former captain, retired after a career highlighted by leading his team to victory in the 2017 Champions Trophy against India. He faced trolling after a yawning incident during a match, earning him the tag 'lazy captain.'
Web Summary : पाकिस्तान के पूर्व कप्तान सरफराज अहमद ने संन्यास लिया। उन्होंने 2017 में भारत के खिलाफ चैंपियंस ट्रॉफी में टीम को जीत दिलाई। एक मैच के दौरान उबासी लेने पर उन्हें ट्रोल किया गया, जिससे उन्हें 'आलसी कप्तान' का टैग मिला।