सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली

सारा तेंदुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असते. तीने नुकतीच क्रिकेटमध्येही मोठी एन्ट्री केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:55 IST2025-05-12T11:54:28+5:302025-05-12T11:55:13+5:30

whatsapp join usJoin us
Sara Tendulkar's new video goes viral; Fans' embarrassing act, mocking her fitness | सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली

सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दिग्गज क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात ती आपल्या कारने कुठे तरी जाताना दिसत आहे. ती कारमध्ये बसण्यापूर्वी लोक तिचा व्हिडिओ बनवत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावर काही चाहत्यांनी काही लाजिरवाण्या कमेंट्सदेखील केल्या आहेत. 

सारा तेंदुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असते. तीने नुकतीच क्रिकेटमध्येही मोठी एन्ट्री केली आहे. सारा ग्लोबल-ई क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकीन आहे. मात्र तिचा संघ संपर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.

खरे तर सारा तेंदुलकर ही आपल्या फिटेससंदर्भात नेहमीच चर्चेत असते. ती वर्कआउटसाठी जीममध्येही जाते. यासंदर्भातील व्हिडिओ देखील समोर येत असतात. इंस्टाबॉलीवुड नावाच्या इंस्टाग्राम पेजवर साराचा एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात ती ब्लू जीन्स आणि पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपवर दिसत आहे. ती कारमध्ये  बसण्यापूर्वी कॅमेरामनला हाय देखील करत आहे आणि नंतर धावत कारमध्ये बसते.


यूजर्सनी उडवलीय खिल्ली -  
साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे. यात काही युजर्स साराच्या सौदर्याचे आणि स्टाइलचे कौतुक करत आहेत, तर काही तिची खिल्ली उडवत आहेत. या लोकांचे म्हणणे आहे की, तिचे वजन वाढले आहे. 

एका चाहत्याने साराची खिल्ली उडवताना, "तिने बॉडीबिल्डिंग सुरू करायला हवी," असे लिहिले आहे. तर एकाने अत्यंत लाजीरवाणी कमेंट करत, "मला वाटते, तिला थायरॉइडची समस्या आहे, अनेक वर्षांपासून रोज जिमला जाते, तरीही जाड आहे," असे म्हटले आहे.

Web Title: Sara Tendulkar's new video goes viral; Fans' embarrassing act, mocking her fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.