Sara Tendulkar Sylish Look Photos: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या फ्रान्समध्ये सुट्टी घालवत आहे. ती कायम सौंदर्य आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. साराने अलीकडेच सोशल मीडियावर स्वतःचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साराने तिच्या ट्रॅव्हल डायरी आणि स्टायलिश लूकने अनेकदा लोकांची मने जिंकली आहेत. यावेळीही तिने असेच काहीसे केले आहे.
फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक
सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने सेल्फी काढतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आकर्षक दिसत आहे. तिच्या ड्रेसचा पॅटर्न तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. मोठे स्टारफिश आकाराचे कानातले आणि हिरव्या स्टोनचा हार तिच्या ड्रेसशी उत्तम सूट होत आहे. तिने या पोस्टसोबत जस्टिन बीबरचे 'डेझीज' हे गाणे लावले आहे.
![]()
साराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि चाहते तिच्या सौंदर्याचे आणि फॅशन सेन्सचे कौतुक करत आहेत. अलिकडेच ती समुद्राच्या लाटांवर विहार करताना दिसली होती. ती तिच्या मैत्रिणी साशा जयराम आणि अलाविया जाफरीसोबत फ्रान्सचा दौरा करत आहे. फ्रान्समध्ये १४ जुलै रोजी फ्रेंच क्रांती झाली. सारा या उत्सवाचाही एक भाग होती.
![]()
अलीकडेच गिलसोबतचा फोटो झालेला व्हायरल
८ जुलै २०२५ रोजी लंडनमध्ये, माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने त्यांच्या YouWeCan फाउंडेशनसाठी एका चॅरिटी डिनरचे आयोजन केले होते. त्यामध्ये क्रिकेट जगतातील अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल संपूर्ण संघासह या कार्यक्रमात पोहोचला होता. त्याच वेळी, सारा तेंडुलकर देखील त्यात सहभागी झाली होती. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. तेव्हा या डिनरची सर्वाधिक चर्चा झाली, ज्यामध्ये शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकत्र दिसत होते.
Web Title: sara tendulkar new look in France in yellow dress hotness beautiful fans delighted see photos
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.