Sara Tendulkar Honored With Special Award : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक असलेल्या सारानं जगभरात आपला वेगळा चाहतावर्ग कमावला आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय दिसते. तिने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या पोस्टवर लाइक्स अन् कमेंट्सची बरसात होत असते. यात आता तिच्या नव्या पोस्टची भर पडलीये. पण यावेळी तिची पोस्ट हटके अन् खास आहे. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी
सारासाठी हा एक अविस्मरणीय क्षण, कारण...
बहुतांश वेळा सारा तेंडुलकर आपल्या स्टायलिश लूक्समधील फोटो पोस्ट करून सर्वांचे लक्षवेधून घेताना पाहायला मिळते. पण यावेळी तिने जी पोस्ट शेअर केलीये ती एकदम हटके आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. साराने जी पोस्ट शेअर केलीये ती तिच्या आयुष्यातील एक खास क्षणच आहे. कारण तिला एका पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
या खास पुरस्काराने सन्मानित झाली सारा
सारा तेंडुलकरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ती व्यासपीठावर दिग्गजांच्या गर्दीत उभी असल्याचे दिसते. हा खास क्षण एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. सारा तेंडुलकरला नवभारत सीएसआर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने आपल्याला मिळालेला हा पुरस्कार आपल्या आई वडिलांना समर्पित केला आहे.
सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डॉयरेक्टर आहे सारा तेंडुलकर
सारा तेंडुलकर हिने परदेशातील उच्च शिक्षण घेतल्यावर सचिन तेंडुलकर फाउंडेशनची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ती क्रिकेटच्या देवाच्या नावाने अर्थात सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डायरेक्टर आहे. ही संस्था गोरगरिब मुलांसाठी कार्यरत आहे. साराच्या आधी तिची आई या संस्थेची डारेक्टर होती. तेंडुलक घराण्याचा समाज कार्यातील वसा आता सारानं आपल्या हाती घेतला आहे.