Join us

'सँटा' सचिन तेंडुलकरची बच्चे कंपनीसोबत धमाल मस्ती!

ख्रिसमसच्या निमित्तानं जगभरात ठिकठिकाणी रोषणाई दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 18:37 IST

Open in App

मुंबई : ख्रिसमसच्या निमित्तानं जगभरात ठिकठिकाणी रोषणाई दिसत आहे. अनेल सेलिब्रिटींनी ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टींचे आयोजन केले आहे. मात्र, या सगळ्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सामाजिक भान जपत बच्चे कंपनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम करत आहे. ख्रिसमस म्हटलं की लाडका सँटा आपल्याला छानछान भेटवस्तू आणणार याची बच्चे कंपनी आतुरतेने वाट पाहतात. तेंडुलकर आज अशाच बच्चे कंपनींसाठी सँटा बनला होता. त्याने गरीब घरांतील मुलांसाठी कार्य करत असलेल्या आश्रय चाईल्ड केअर सेंटरला भेट दिली आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर एकच हास्य फुलले.

ख्रिसमसच्या निमित्ताने तेंडुलकर सँटा बनून आश्रमात दाखल झाला. थोड्यावेळानंतर त्याने आपली खरी ओळख मुलांना करुन दिली. तेंडुलकर त्या मुलांसोबत क्रिकेटही खेळला. त्यांना गिफ्टही दिले.  

तेंडुलकरच्या या पुढाकाराचे नेटिझन्सकडून जोरदार कौतुक होत आहे.

 

टॅग्स :सचिन तेंडुलकरनाताळ