ICC T20 World Cup 2026, Team India Enter Semi Final : संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने कोलकताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या मैदानात विक्रमी विजय मिळवत सेमीफायलमध्ये प्रवेश केला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सहाव्यांदा टीम इंडियाने सेमीफायलपर्यंत मजल मारली आहे. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियासमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग भारतीय संघाने ५ विकेट्स राखून विजय नोंदवला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून दाखवला आहे. त्यामुळे हा विजय टीम इंडियासाठी विक्रमी ठरला.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारती संघाचा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड
- भारत वि. दक्षिण आफ्रिका, २०१४ – १७३
- भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०१६ – १६१
- भारत वि. पाकिस्तान, २०२२ – १६०
- भारत वि. बांगलादेश, २०१४ – १३९
IND vs WI : एकच वादा सूर्या दादा... हवेत झेपावत अविश्वसनीय झेल घेत लुटली मैफिल (VIDEO)
संजू सॅमसनची नाबाद ९७ धावांची खेळी, अन्य बॅटर ३० धावांच्या आकड्यापर्यंतही नाही पोहचला
वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून संजू सॅमसन याने पहिले वहिले अर्धशतक साजरे केले. संजूनं ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९७ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच्य़ाशिय तिलक वर्मा याने १५ चेंडूत केलेल्या २७ धावा ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली दुसरी धावसंख्या होती. त्यामुळेच 'सिटी ऑफ जॉय' कोलताकाच्या मैदानातील संजूची खेळी अविस्मरणीय ठरते. त्याच्या या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाने सेमीच तिकीट पक्के केले. वेस्ट इंडिजच्या संघाकडून शमार जोसेफ आणि होल्डर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय अकिल हौसेन याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
भारत- इंग्लंड यांच्यात रंगणार सेमीफायलचा थरार!
वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाने सुपर ८ फेरतील पहिल्या गटात दुसऱ्या स्थानासह सेमीच तिकीट बूक केले आहे. त्यामुळे सेमीफायलमध्ये भारतीय संघ आता दुसऱ्या गटातील अव्वलस्थानावरील इंग्लंडविरुद्ध सेमीफायल खेळताना दिसेल. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.