IPL 2026: पहिली मॅच सहा विकेटनी काय हरले...! संजीव गोयंकांनी धोनी, राहुलनंतर ऋषभ पंतलाही नाही सोडले

IPL 2026: दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि ऋषभ पंत यांच्यातील व्हायरल व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. धोनी आणि राहुलसोबतच्या जुन्या वादांची पुन्हा चर्चा का सुरू झाली? वाचा सविस्तर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:14 IST2026-04-02T11:13:07+5:302026-04-02T11:14:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sanjiv Goenka Rishabh Pant Fight: Why did they lose the first match by six wickets...! Sanjeev Goenka did not spare even Rishabh Pant after Dhoni and Rahul | IPL 2026: पहिली मॅच सहा विकेटनी काय हरले...! संजीव गोयंकांनी धोनी, राहुलनंतर ऋषभ पंतलाही नाही सोडले

IPL 2026: पहिली मॅच सहा विकेटनी काय हरले...! संजीव गोयंकांनी धोनी, राहुलनंतर ऋषभ पंतलाही नाही सोडले

आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. १ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊला ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पराभवापेक्षा मैदानावर जे घडलं, त्याचीच चर्चा सध्या क्रिकेट विश्वात रंगली आहे. टीमचे मालक संजीव गोयंका, कर्णधार ऋषभ पंत आणि हेड कोच जॅस्टिन लँगर यांच्यातील एका 'एनिमेटेड' (उग्र) संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

ऋषभ पंतवर गोयंकांचा संताप?
सामना संपल्यानंतर भर मैदानात संजीव गोयंका ऋषभ पंतशी चर्चा करताना दिसले. ही चर्चा केवळ साधी संवाद वाटत नव्हती, तर गोयंका यांच्या देहबोलीवरून ते पंतवर नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते. २७ कोटींची विक्रमी बोली लावून संघात घेतलेला ऋषभ पंत अद्याप अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. २०२५ मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेला होता, आणि आता २०२६ ची सुरुवातही पराभवाने झाल्याने गोयंकांचा संयम सुटल्याचे बोलले जात आहे.

धोनी आणि राहुलचा 'तो' अपमान आठवला!
संजीव गोयंका आणि त्यांच्या संघातील कर्णधार यांच्यात खटके उडण्याची ही पहिलीच वेळ नाही. चाहत्यांनी समाजमाध्यमांवर गोयंका यांच्या जुन्या 'कर्णधार प्रकरणांचा' पाढाच वाचला आहे: 

एमएस धोनी (२०१७): रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक असताना गोयंकांनी धोनीला तडकाफडकी कप्तानीवरून हटवून स्टीव्ह स्मिथला कर्णधार केले होते. त्यावेळी हर्ष गोयंका यांच्या एका ट्विटमुळे धोनीच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता.

केएल राहुल (२०२४): गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर गोयंका यांनी केएल राहुलला मैदानातच सर्वांसमोर झापले होते. त्या घटनेनंतर राहुलने संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आकडेवारी काय सांगते?
गोयंकांच्या मालकीच्या संघात कर्णधारांची खुर्ची नेहमीच डळमळीत राहिली आहे. २०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली पुणे संघ ७ व्या क्रमांकावर होता. केएल राहुलने २०२४ मध्ये संघाला ७ व्या क्रमांकावर नेले, तर आता ऋषभ पंतच्या काळातही लखनऊची गाडी ७ व्या क्रमांकावरून पुढे सरकताना दिसत नाहीये. 

Web Title : IPL 2026: हार के बाद गोयनका ने पंत को फटकारा, दोहराए धोनी, राहुल प्रकरण।

Web Summary : लखनऊ सुपर जायंट्स के मालिक संजीव गोयनका की हार के बाद ऋषभ पंत के साथ गरमागरम बातचीत से विवाद खड़ा हो गया। गोयनका ने पहले धोनी को कप्तानी से हटाया और केएल राहुल को सार्वजनिक रूप से फटकारा, जिससे टीम के नेतृत्व और स्थिरता पर सवाल उठे।

Web Title : IPL 2026: Goenka rebukes Pant after loss, repeats Dhoni, Rahul episodes.

Web Summary : Lucknow Super Giants' owner Sanjiv Goenka's animated conversation with Rishabh Pant after a defeat sparks controversy. Goenka previously removed Dhoni as captain and publicly admonished KL Rahul, raising questions about team leadership and stability.