- अयाझ मेमन
भारतीय संघ निवडकर्ते रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला संजिवनी दिली आहे. त्याला कसोटी क्रिकेट मध्ये डावा सुरुवात करण्याची संधी मिळु शकते.
शर्मा सध्या कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत संघर्ष करत आहे. मात्र मुख्य निवडकर्ते एम.एस.के. प्रसाद यांनी त्याच्यावर विश्वास दाखवण्याचे संकेत दिले आहेत. त्याला किती सामन्यात संधी मिळेल, हे सांगता येत नाही. शर्मा विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये होता.त्याने पाच शतके केली. त्यानंतर कसोटी त्याला संधी मिळाली नाही. अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी कसोटी संघात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आपले महत्त्व सिद्ध केले आहे. हे दोन्ही फलंदाज सातत्याने धावा करताना दिसले. मात्र लोकेश राहूल दोन्ही सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे रहाणेला देखील डावाची सुरूवात करण्याची संधी आहे.
रोहित शर्मासमोर या प्रकारात एक मोठे आव्हान असेल ते स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचे. कसोटी क्रिकेट खेळताना एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटसारखी मानसिकता ठेवता येत नाही. रोहित शर्माकडे क्षमता आहे. मात्र त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी फारशी परिणामकारक नाही. त्याला कसोटी दोन वेळाच मोठी खेळी करता आली आहे. त्यानंतर मात्र त्याने निराशा केली. त्याने मानसकिता बदलून खेळ करायला हवा.
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)