Sanjay Bangar Transgender Anaya Bangar: टीम इंडियाचा माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर याच्या मुलाने इंग्लंडमध्ये लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. तो मुलीमध्ये रूपांतरित झाला. लिंग बदलण्यासोबतच नावही बदलले. आधी तो आर्यन बांगर ( Aryan Bangar ) होता, पण आता ती अनया बांगर म्हणून ओळखली जाते. अनया बांगर लिंग बदलल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच भारतात पोहोचली आणि इथे येताच तिने लूक बदलले. तसेच हेअरस्टाइलदेखील बदलून टाकली. मुलगी झाल्यावर तिने पहिल्यांदाच डान्स व्हिडीओ पोस्ट केला, त्यातच आता तिने एक फोटोशूट पोस्ट केलाय, ज्यामुळे ती मॉडेलिंगच्या ( Modelling ) वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लिंगबदल शस्त्रक्रियेआधी आर्यन बांगर क्रिकेट खेळायचा. त्याचे क्रिकेटमधले आकडे फारसे उल्लेखनीय नव्हते. पण तरीही त्याने काही सामने खेळले. त्यानंतर तो इंग्लंडला गेला आणि तेथून परतताना अनया या नावासह सर्वार्थाने मुलगी बनून परतली. अनया झाल्यावर तिने एका डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात असे सांगण्यात आले होते की अनयाला क्रिकेटशिवाय डान्सही उत्तम करता येतो. त्यात आज अनयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ताजं फोटोशूट पोस्ट केलंय. हे फोटोशूट कशाबद्दल आहे त्याची कल्पना नाही. पण तिने हे फोटोशूट केल्यामुळे आता ती मॉडेलिंगच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
भारतात येताच 'मेकओव्हर'
दरम्यान, अनया बांगर भारतात पोहोचल्यानंतर सलॉनमध्ये गेली. तिने तिचा नवीन मेकओव्हर केला. जेव्हा ती भारतात पोहोचली होती तेव्हा विमानतळावर तिचे केस कुरळे दिसले होते. पण नव्याने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तिची केसांची स्टाइल बदलली. भारतात पोहोचल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनन्या बांगरने केस सरळ म्हणजेच हेअर स्ट्रेटनिंग केल्याचे दिसले.
लिंगबदल प्रक्रियेचा प्रवास कठीण होता...
अनया बांगर इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहते आणि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अलीकडेच, तिने सोशल मीडियावर तिच्या लिंग परिवर्तनाच्या प्रवासाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिची हार्मोनल रिप्लेसमेंट सर्जरी झाली असून ती सर्वार्थाने मुलीसारखी होत असल्याचे तिने सांगितले आहे.