Join us

"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:21 IST

Open in App

हरभजन सिंह आणि गीता बसरा यांच्या 'हू इज द बॉस' या शोच्या पुढच्या भागात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि  संजना गणेशन  या सुपर हिट जोडीची झलक पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो समोर आला असून यात संजना गणेशन हिने आपल्या 'बोलंदाजी'वर  जसप्रीत बुमराहला क्लीन बोल्ड केल्याचे दिसते. लग्नाआधीचा खास किस्सा सांगितल्यावर जसप्रीत बुमराहचा चेहराच पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट

जसप्रीत बुमराह याने मार्च २०२१ मध्ये स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत लग्न केले. दोघांची जोडी एकदम सुपर हिट आहे. हरभजन अन् गीता बसरा यांच्यासोबत गप्पा गोष्टी करताना संजनानं लग्नाआधीचा एक खास किस्सा शेअर केला. व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसते की, लग्नाआधी बुमराह एकदा म्हणाला होता की, "चल पळून जाऊन लग्न करुया..."  संजनानं यावर दिलेल्या रिप्लायची गोष्ट सांगितल्यावर बुमराहचा चेहराच पडला.  या कार्यक्रमात दोघांच्यात नात्यातील अनेक गोष्टी ऐकायला मिळू शकतात, याची झलक प्रोमोत दिसून येते. 

शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

इंग्लंड दौऱ्यात संजना-बुमराह जोडी ठरतीये लक्षवेधी

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन दोघेही स्पोर्ट्सशी कनेक्टेड आहेत. लग्नाआधी दोघांनी आपल्या नात्याबद्दलची कुणाला भनकही लागू दिली नव्हती. सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर आहे. तो टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करत असून दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी संजना स्पोर्ट्स अँकरच्या रुपात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत दिसत नाही. तिने घेतलेली बुमराहची मुलाखतही चांगलीच चर्चेत आली होती.

पहिला सामना खेळला, आता एक ब्रेक घेणार बुमराह

जसप्रीत बुमराहच्या कामगिरीविषयी बोलायचं तर इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने पाच विकेट्स घेतल्या. पण दुसऱ्या डावात तो विकेट लेस राहिला. भारतीय संघाने हा सामना ५ विकेट्सने गमावला होता. दुसऱ्या सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात येणार असून तिसऱ्या कसोची सामन्यात तो पुन्हा मैदानात उतरेल, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. 

 

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशनऑफ द फिल्ड