Join us

शोएब मलिकच्या या ट्विटवर सानिया मिर्झाने आपटले डोकं

काही दिवसांपूर्वी सानियाचा पती शोएबने एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्या फोटोखाली शोएबने विथ बाय, असे लिहिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 16:59 IST

Open in App
ठळक मुद्देहे जेव्हा सानियाने वाचलं तेव्हा तिने डोक आपटून घेतलं, पण ते ईमोजीच्या माध्यमातून.

नवी दिल्ली : एखाद्या गोष्टीचा कोण कसा अर्थ घेईल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच शोएब मलिकच्या एका ट्विटवर सानिया मिर्झाला आपले डोके आपटून घ्यावे लागले.

सध्याच्या घडीला सानिया गरोदर आहे. तिने काही दिवसांपूर्वीच आपले एक फोटोशूट केले होते. या शूटला चाहत्यांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला होता. काही दिवसांपूर्वी सानियाचा पती शोएबने एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्या फोटोखाली शोएबने विथ बाय, असे लिहिले होते. या ओळीचा अर्थ होतो की, मी माझ्या बेबीबरोबर आहे. पण पाकिस्तानमधील एका वर्तमानपत्राने या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावला शोएबने सानियाला बेबी, हे नवीन नाव ठेवलं आहे, असं त्या वर्तमात्रपत्राध्ये छापून आलं. हे जेव्हा सानियाने वाचलं तेव्हा तिने डोक आपटून घेतलं, पण ते ईमोजीच्या माध्यमातून.

हे आहे सानियाचे ट्विट

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिक