Join us

सानिया-शोएब यांनी शेअर केला मुलगा इझानचा गोड फोटो

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याच्या घरी  बाळाचा जन्म झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:10 IST

Open in App

हैदराबाद : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याच्या घरी  बाळाचा जन्म झाला. 30 ऑक्टोबरला सानिया-शोएबला पुत्रप्राप्ती झाली आणि दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. पण, इझानला पाहण्यासाठी दोन्ही खेळाडूंचे चाहते उत्सुक होते आणि शनिवारी सानिया व शोएब सोशल मीडियावर इझानचा फोटो पोस्ट केला. याआधी सोशल मीडियावर सानिया-शोएबच्या मुलाचा बनावट फोटो पोस्ट करण्यात आला होता, परंतु शोएबने त्यावर प्रतिक्रीया देताना अद्याप आम्ही बाळाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली नसल्याचे सांगितले होते. मात्र, शनिवारी या दोघांनीही एकाच वेळी इझानचा फोटो पोस्ट केला. सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते. २००९ साली सानिया आणि सोहराब यांचा साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला. त्याचवेळी सानियाचे करीअरमध्येही काही चांगले सुरु नव्हते. वाईट फॉर्मातून सानिया जात होती. दुसरीकडे शोएबलाही क्रिकेटमध्ये जास्त धावा करता येत नव्हता. सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद घडला. या संवादाचे पुढे मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. जेव्हा सानिया आणि शोएब भेटले तेव्हा ते दोघेही समदु:खी होते. पण लग्न केल्यावर मात्र दोघांचे आयुष्य पालटून गेले.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिक