हैदराबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांना पुत्र झाला. शोएबने ट्विटर अकाऊंटवर ही घोषणा केली. त्याने लिहीले की,''तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मला मुलगा झाला आणि सानिया सुखरुप आहे. आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.''
गर्भवती असल्यामुळे सानिया मिर्झा बराच काळ टेनिसपासून दूर होती, परंतु सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह होती. दरम्यान मलिकही पाकिस्तान संघासोबत क्रिकेट दौऱ्यावर व्यग्र होता.