Join us

Shoaib Malik सोबत तलाकच्या बातम्या येत असतानाच सानियानं लिहिली अशी पोस्ट, सोशल मीडियावर उडाला गोंधळ

एकेकाळी सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह केमिस्ट्रीने सर्वांच्याच मनाला भुरळ घातली होती, मात्र, आता समोर आलेल्या सानियाच्या एका पोस्टने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 18:11 IST

Open in App

इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक, यांचे नाव खेळ जगतातील काही पॉवर कपलमध्ये घेतले जाते. गेल्या काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपला मुलगा इझानचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा केला होता. याचे फोटोही शोएब मलिकने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, कदाचित या हसऱ्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली आहे. या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या सध्या हवे सारख्या पसरत आहेत.

सानिया-शोएबचे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर? -एकेकाळी सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह केमिस्ट्रीने सर्वांच्याच मनाला भुरळ घातली होती, मात्र, आता समोर आलेल्या सानियाच्या एका पोस्टने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. इन्स्टा स्टोरीत आपल्या भावना शेअर करत तिने लिहिले, 'टूटे हुए दिल कहां जाते हैं? अल्लाह को खोजने के लिए'. खरे तर, सानिया आणि शोएब यांच्या दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत असतानाच सानियाने ही पोस्ट केली आहे. यामुळे, तिचे चाहतेही चिंतित झाले आहेत.

सानियाला चीट करतोय शोएब? -खरे तर या जोडप्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेत किती तथ्य आहे, हे सांगता येत नाही आणि यामागील सत्यही अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पाकिस्तानातील काही माध्यमांमधील वृत्तांनुसार, शोएब मलिकने त्याच्या एका टीव्ही शो दरम्यान कथितपणे सानियाला चीट केले. एवढेच नाही, तर हे जोडपे आता वेगळे झाले असून, गेल्या काही काळापासून वेगळेच राहत असल्याचेही पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. याशिवाय, मुलगा इझानच्या को-पॅरेंटिंगमुळे हे दोघेही आता एकत्र असल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या, माध्यमांतील या वृत्तांची आम्ही पुष्टी करत नाही. 

 

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब अख्तरपाकिस्तान
Open in App