Join us  

Shoaib Malik: अल्लाहनं शोएब मलिकला याच पत्नीसोबत आयुष्यभर खुश ठेवावं - शाहिद आफ्रिदी

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक विभक्त झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:06 PM

Open in App

Sania Mirza and Shoaib Malik Divorce: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक विभक्त झाले आहेत. सानिया आणि शोएब यांना एक मुलगा आहे. शोएबने तिसऱ्यांदा लग्न केले असून आता तो पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाहबंधनात अडकला. अद्याप सानियाने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तिच्या वडिलांनी हा 'खुला' असल्याचे सांगून सानियाच्या संमतीने सर्वकाही झाले असल्याचे स्पष्ट केले.  

शोएब मलिकला त्याच्या तिसऱ्या लग्नानिमित्त पाकिस्तानचे खेळाडू शुभेच्छा देत आहेत. आता पाकिस्तानचा दिग्गज आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मलिकला शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानातील समा टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदी पाकिस्तानातील चालू क्रिकेट घडामोडींवर भाष्य करत होता. यावेळी त्याने पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मालिकेवरून आपल्या संघाचे कान टोचले.  

खरं तर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानला पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत १-४ असा पराभव स्वीकारावा लागला. शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तानने द्विपक्षीय मालिका खेळली. शोएब मलिकला शुभेच्छा देताना आफ्रिदीने म्हटले, "शोएब मलिकला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. अल्लाहने त्याला याच पत्नीसोबत आयुष्यभर खुश ठेवावं."  

शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. खरं तर शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असं आहे.

टॅग्स :शोएब मलिकशाहिद अफ्रिदीपाकिस्तानसानिया मिर्झालग्न