संदीप शर्माने केले आयपीएल बळींचे शतक

IPL 2020: ८७ सामन्यात घेतले १०० बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 21:40 IST2020-10-24T21:40:37+5:302020-10-24T21:40:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sandeep Sharma scores a century of IPL wickets | संदीप शर्माने केले आयपीएल बळींचे शतक

संदीप शर्माने केले आयपीएल बळींचे शतक

लोकमत न्यूज नेटवर्क
सनरायजर्सचा जलदगती गोलंदाज संदीप शर्मा याने किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधातील सामन्यात आपल्या आयपीएल बळींचे शतक पुर्ण केले आहे.
संदीप याने २०१३ च्या सत्रात आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला त्याने एकुण ८७ सामन्यात ही कामगिरी केली.


संदीप हा आयपीएल बळींचे शतक पुर्ण करणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. संदीप याने २०१३ च्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाब कडून पदार्पण केले. हा
सामना सनरायजर्स हौदराबादविरोधात झाला होता. त्यात त्याने हनुमा विहारी याला बाद करत आयपीएलमधील आपला पहिला बळी मिळवला होता.
पहिल्याच सामन्यात त्याने तीन गडी बाद केले होते. विलक्षण योगायोग म्हणजे पहिला बळी पंजाबकडून सनरायजर्सच्या फलंदाजाचा
घेणाºया संदीपने आपला शंभरावा बळी सनरायजर्सकडून खेळताना पंजाबच्या मनदीप सिंगचा घेतला आहे.


त्याने ८७ सामन्यात ७.८१ च्या इकॉनॉमीने १०० बळी घेतले आहेत. त्याने २०१७ मध्ये एकाच सामन्यात आरसीबीकडून खेळणाºया ख्रिस गेल, विराट
कोहली आणि ए.बी. डिव्हिलियर्स यांना बाद केले होते. एकाच सामन्यात या तीन विध्वसंक फलंदाजांना बाद करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे.
२०१३ ते २०१७ च्या सत्रांमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. २०१८ च्या सत्रात सनरायजर्सने त्याला तीन कोटींची बोली लावून आपल्या 
ताफ्यात सामील करून घेतले. २०१८ च्या सत्रात त्याने १२ बळी घेतले होते.


 १०० किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारे भारतीय जलदगती गोलंदाज
भुवनेश्वर कुमार १३६
उमेश यादव ११९
आशिष नेहरा १०६
विनय कुमार १०५
जहीर खान १०२
संदीप शर्मा १००

Web Title: Sandeep Sharma scores a century of IPL wickets

टॅग्स :IPL 2020IPL 2020