Join us

सचिन, रोहित, विराट हे रिहानाचे कान टोचत असताना संदीप शर्मानं घेतली तिची बाजू; पण...

आंतरराष्ट्रीय गायिका रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले.

By स्वदेश घाणेकर | Updated: February 4, 2021 15:14 IST

Open in App

भारताचा आणि सनरायझर्स हैदबाद ( SRH) संघाचा गोलंदाज संदीप शर्मा ( Sandeep Sharma) यानं पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हिच्या समर्थनात ट्विट करताना अनेकांचे कान टोचले. इंडियन प्रीमिअर लीग ( IPL ) मधील हैदराबाद संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या संदीपनं रिहानावर टीका करण्यामागे काहीच 'logic' नसल्याचे सांगताना खरमरीत ट्विट केलं. पण, हे ट्विट त्याच्या विरोधात जाणार असल्याचे समजताच त्यानं ते डिलीट केलं होतं. तोपर्यंत त्याच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका

आंतरराष्ट्रीय गायिका रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. या सर्वांना उत्तर म्हणून देशातील अनेक सेलिब्रेटिंनी ट्विट केले. सोशल मीडियावर जणू ट्विटरवॉर सुरू झाला आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, प्रग्यान ओझा यांनी हा देशाचा अंतर्गत मुद्दा आहे, बाहेरच्यांनी त्यात नाक घुसवायची गरज नाही असा सल्ला दिला. पण, संदीप शर्माचं मत काही वेगळंच होतं. सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

त्यानं ट्विट केलं की,''या लॉजिक नुसार कुणालाच कुणाची काळजी करायला नको. प्रत्येक परिस्थिती ही कुणाचातरी अंतर्गत मुद्दा असतो.'' 'तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड! रिहानानं शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. यावरून तिच्यावर टीका झाली, पण संदीपनं तिची बाजू घेतली. पण, काही वेळातच त्यानं हे ट्विट डिलीट केलं.  

टॅग्स :शेतकरी आंदोलनसनरायझर्स हैदराबादसचिन तेंडुलकरविराट कोहलीरोहित शर्मा