Join us

SL vs IND : भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेची रणनीती; Sanath Jayasuriya वर सोपवली मोठी जबाबदारी

सनथ जयसूर्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:31 IST

Open in App

India vs Sri Lanka ODI Series : दिग्गज सनथ जयसूर्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील खराब कामगिरीनंतर श्रीलंकेचा संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला. भारताविरूद्धच्या वन डे मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने जयसूर्याला आपल्या संघाचा प्रशिक्षक बनवले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात २८ जुलैपासून वन डे मालिका खेळवली जाणार आहे. 

ट्वेंटी-२० विश्वचषकात श्रीलंकेचा संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला. क गटातील श्रीलंकेला केवळ दोन सामने जिंकता आले. फ्लोरिडा येथे झालेला नेपाळविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना सुपर-८ पर्यंत पोहोचता आले नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, आमच्या राष्ट्रीय संघाचा Interim Head Coach म्हणून सनथ जयसूर्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये श्रीलंकेचा इंग्लंड दौरा पूर्ण होईपर्यंत तो या पदावर कार्यरत राहील. 

दरम्यान, श्रीलंका क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठे नाव म्हणून सनथ जयसूर्याची ओळख आहे. त्याने ५८६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. डावखुऱ्या या फलंदाजाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये २१,०३२ धावा केल्या आहेत. जयसूर्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०३ अर्धशतके आणि ४२ शतके झळकावण्याची किमया साधली. 

टॅग्स :श्रीलंकाआंतरराष्ट्रीय क्रिकेटभारत विरुद्ध श्रीलंका