Video : शोएब मलिकसाठी मैदानावर आलेल्या सना जावेदला प्रेक्षकांनी सानियाच्या नावाने डिवचलं 

अलीकडेच शोएब मलिकशी लग्न करणारी ही अभिनेत्री PSL सामन्यात पतिला चिअर करण्यासाठी आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 03:17 PM2024-02-20T15:17:30+5:302024-02-20T15:17:59+5:30

whatsapp join usJoin us
Sana Javed Attends PSL To Support Shoaib Malik, Crowd Screams 'Sania Mirza'; Video Viral | Video : शोएब मलिकसाठी मैदानावर आलेल्या सना जावेदला प्रेक्षकांनी सानियाच्या नावाने डिवचलं 

Video : शोएब मलिकसाठी मैदानावर आलेल्या सना जावेदला प्रेक्षकांनी सानियाच्या नावाने डिवचलं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद ( Sana Javed) पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात खेळणाऱ्या पती शोएब मलिकला ( Shoaib Malik) याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली. पण, तिला तेथे प्रेक्षकांनी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या ( Sania Mirza) हिच्या नावाने चिडवले. अलीकडेच शोएब मलिकशी लग्न करणारी ही अभिनेत्री PSL सामन्यात पतिला चिअर करण्यासाठी आली होती. शोएब कराची किंग्जकडून खेळत होता.  

मोठ्या हौसेने स्टेडियमवर पोहोचली सना जावेद; तिसऱ्या पत्नीसमोर शोएब मलिकची फजिती


सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सना जावेद मैदानाच्या सीमारेषेबाहेर एका चेअरवर बसली आहे आणि सामना पाहत असताना मागे स्टँडवर बसलेल्या एका व्यक्तीने सानिया मिर्झाचे नाव ओडरण्यास सुरुवात केली.  त्याला इतर प्रेक्षकांचाही पाठींबा मिळाला आणि तेही सानियाच्या नावाचे तिला चिडवायला लागले. सुरुवातीला सनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याचे टाळले. मात्र, ती मागे वळून गर्दीकडे पाहून हसताना दिसत होती. 



सना जावेदने जानेवारीमध्ये शोएबशी लग्न केले होते. या जोडप्याने त्यांच्या लग्न समारंभातील फोटो पोस्ट करून त्यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. मलिकने सोनेरी तपशीलांनी सजलेली पांढरी शेरवानी परिधान केली होती, तर सना हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या नवरीच्या वेशात दिसत होती. 


सना जावेदसोबत लग्न होण्यापूर्वी शोएब मलिकने सानिया मिर्झाशी लग्न केले होते. एप्रिल २०१० मध्ये हैदराबादमध्ये एका भव्य समारंभात या जोडप्याने लग्न केले आणि ते दुबईत होते. शोएबच्या सनासोबतच्या लग्नाच्या बातम्यांनंतर सानियाने 'खुला' मागितल्याचे समोर आले आहे. खुला एक इस्लामिक न्यायशास्त्र आहे ज्याद्वारे एक स्त्री तिच्या पतीपासून एकतर्फी घटस्फोट घेऊ शकते.

Web Title: Sana Javed Attends PSL To Support Shoaib Malik, Crowd Screams 'Sania Mirza'; Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.