Join us  

Sam Curran: IPLच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूवर ICC ची कारवाई; सेलिब्रेशन करणं पडलं महागात

sam curran bavuma:  सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 12:40 PM

Open in App

SA vs ENG । नवी दिल्ली : सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला आयसीसीने मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेम्बा बवुमाची विकेट मिळाल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमुळे सॅम कुरनवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात सॅम कुरनने टेम्बा बवुमाला बाद केले. त्या सामन्यात आफ्रिकन कर्णधार बवुमाने 102 चेंडूत 109 धावांची शतकी खेळी केली होती. मात्र, हा महत्त्वाचा बळी पटकावल्यानंतर सॅम कुरन आनंदाच्या भरात बवुमाच्या खूप जवळ गेला होता. 

सॅम कुरनकडून ICC च्या नियमांचे उल्लंघन इथे सॅम कुरनने आयसीसी आचारसंहितेचा लेव्हल-1 गुन्हा केला. यानुसार जे खेळाडू फलंदाज बाद झाल्यानंतर अतिउत्साहाने आनंद साजरा करतात आणि त्याच्या अगदी जवळ पोहोचतात, अशा कृती करतात ज्यामुळे फलंदाजाला प्रत्युत्तर देण्यास प्रवृत्त केले जाते. खरं तर 24 महिन्यांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूला चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळाले तर त्याच्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात येते. आताच्या घडीला सॅम कुरनचा या कालावधीतील पहिला डिमेरिट पॉइंट आहे.

दक्षिण आफ्रिकेची विजयी आघाडी 3 सामन्यांच्या वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने सलामीचे दोन सामने जिंकून 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश संघाला 7 धावांनी पराभवाची धूळ चारली होती. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 5 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. आता या मालिकेत इंग्लंडवर क्लीन स्वीपचा धोका उद्भवला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :इंग्लंडद. आफ्रिकाआयपीएल २०२२सॅम कुरेनआयसीसी
Open in App