साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन

साक्षीच्या एका फोटोमुळे सुरू झाली महेंद्रसिंग धोनी दुसऱ्यांदा बाबा बनल्याची चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 12:30 PM2020-08-11T12:30:10+5:302020-08-11T12:30:34+5:30

whatsapp join usJoin us
Sakshi Dhoni Shares A Picture Of Ziva With A Baby; Baffled Netizens Ask, 'Who Is He/she?' | साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन

साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. लॉकडाऊनच्या काळात कॅप्टन कूल धोनी त्याच्या रांची येथील फार्म हाऊसवर कसा वेळ घालवत आहे, याचे अपडेट साक्षीच्या सोशल पोस्टवरून मिळत असतात. अशाच एका पोस्टनं सध्या धोनी अन् साक्षी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. साक्षीनं सोमवारी एक फोटो पोस्ट केला. त्यात मुलगी जिवाच्या मांडीवर एक लहान बाळ दिसत आहे. त्यावरून नेटिझन्सनी धोनी-साक्षी यांना पुन्हा आई-बाबा बनल्यामुळे अभिनंदन केलं. अनेकांनी हा हार्दिक पांड्याचा मुलगा असल्याचाही अंदाज व्यक्त केला.  

संधी मिळाल्यास अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी नक्की येईन; पाकिस्तानी क्रिकेटपटूची इच्छा 

मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय; तिथे 'देवी' जागृत आहे; केदार शिंदेंचा सरकारला टोला


 IPL 2020 साठी महेंद्रसिंग धोनी झाला सज्ज; 'कॅप्टन कूल'चा नवा लुक व्हायरल
दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) सज्ज झाला आहे. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तो रांची येथील फार्महाऊसवर आहे. या काळात धोनी सेंद्रीय शेती करतानाचे वृत्त होते आणि तसे फोटो व व्हिडीओही व्हायरल झाले होते. याच काळात धोनीचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात धोनी सफेद दाढीत दिसत होता आणि त्याचं वजनही वाढल्याचं दिसत होते. पण, आता आयपीएल होणार हे निश्चित झाल्यानंतर धोनीचा नवा लूक समोर आला आहे.

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 
 

Web Title: Sakshi Dhoni Shares A Picture Of Ziva With A Baby; Baffled Netizens Ask, 'Who Is He/she?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.