Join us

IPL 2025 : यंदाच्या हंगामात ४०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला साई; पूरनलाही टाकले मागे

यंदाच्या हंगामात हा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. निकोलस पूरनला मागे टाकत आता ऑरेंज कॅपही त्याने आपल्याकडे घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 23:01 IST

Open in App

IPL 2025 Sai Sudarshan Record : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर साई सुदर्शन याने यंदाच्या हंगामातील आणखी एक अर्धशतक झळकावले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात साईनं ४०० धावांचा पल्लाही पार केला. यंदाच्या हंगामात हा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. निकोलस पूरनला मागे टाकत आता ऑरेंज कॅपही त्याने आपल्याकडे घेतली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 ५० पेक्षा अधिक सरासरीसह १५० प्लसच्या स्ट्राइक रेटनं काढतोय धावा

साई सुदर्शन याने आठव्या सामन्यातील आठव्या डावात ४०० धावांचा पल्ला पार केला. त्याने ५२.१२ च्या सरासरीसह १५२.१९ च्या स्ट्राइक रेटनं ४१७ धावा केल्या आहेत. यात त्याने ५ अर्धशकासह एक शतकही झळकावले आहे. पहिल्या आठ सामन्यात त्याच्या भात्यातून ३६ चौकार आणि १४ षटकार पाहायला मिळाले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीसह तो यंदाच्या हंगाम गाजवताना दिसतोय.  

IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)

सूर्यकुमार कोहलीवरही पडला भारी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत घाडीच्या पाच फलंदाजांमध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. ज्यात साई सुदर्शन हा सूर्यकुमार आणि विराट कोहलीपेक्षाही खूप पुढे निघून गेल्याचे दिसून येते. या तिघांशिवाय निकोलस पूरन आणि जोस बटलरही टॉप ५ मध्ये आहेत.  

आयपीएल २०२५ ऑरेंज कॅपच्या शर्यतीती फलंदाज

  • १. साई सुदर्शन - ४१७ धावा
  • २. निकोलस पूरन - ३६८ धावा
  • ३. जोस बटलर - ३४५ धावा
  • ४. सूर्यकुमार यादव - ३३३ धावा
  • ५. विराट कोहली - ३२२ धावा
टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५गुजरात टायटन्सकोलकाता नाईट रायडर्स