टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीच तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाने सलामीवीर साहिबजादा आणि फखर झमान यांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर यजमान श्रीलंकेसमोर २१२ धावा केल्या आहेत. फलंदाजांनी आपली भूमिका बजावल्यावर आता गोलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे कारण फक्त मॅच जिंकायची नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवला तरच पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत टिकणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पाक सलामवीरांची विश्वविक्रमी भागीदारी, २१३ धावांचं टार्गेट, पण श्रीलंकेला एवढ्या धावांवर रोखण्याचं चॅलेंज
पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावा काढल्या असल्या तरी गोलंदाजांना श्रीलंकेच्या संघाला १४७ धावांपर्यंतच रोखावे लागेल. जर श्रीलंकेनं १४८ धावा काढल्या तर पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडेल. नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फखर झमान आणि साहिबजा या दोघांनी डावाची सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी रचली. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वोच्च भागीदारी ठरली.
T20 World Cup New Record : पाकच्या साहिबजादानं साधला मोठा डाव; किंग कोहलीचा ऑलटाइम रेकॉर्ड मोडला
साहिबदाजाची विक्रमी सेंच्युरी! पाकिस्तानने अखेरच्या २५ चेंडूत ३६ धावांत गमावल्या ८ विकेट्स
फखर झमान याने ४२ चेंडूत २२० च्या स्ट्राईक रेटनं ८४ धावांची खेळी केली. १६ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर साहिबजादा याने यंदाच्या हंगामातील दुसरे शतक साजरे केले. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात एका हंगामात दोन शतके झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला. पण या दोघांशिवाय अन्य एकाही पाकिस्तानी बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी पाकिस्तानचा संघ २१२ धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी विश्वविक्रमी भागीदारी रचल्यावर पाकिस्तानचा संघ २३० पेक्षा अधिक धावांचा पल्ला सहज गाठेल, असे वाटत होते. पण ही जोडी माघारी फिरल्यावर एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाकिस्तानच्या संघाने अखेरच्या २५ चेंडूत फक्त ३६ धावांत ८ विकेट्स गमावल्या.