नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीचे सदस्य असताना आयपीएलमध्ये फ्रेंचायझी टीमचे मेंटर म्हणून कामकाज पाहत असलेल्या सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंना बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबंधप्रकरनी नोटिस पाठविली आहे. विशेष म्हणजे सचिनला त्याच्या ४६व्या वाढदिवसाच्या दिवशीच बीसीसीआयच्या लोकपालांनी ही नोटिस पाठविली.सचिन मुंबई इंडियन्सचा, तर लक्ष्मण सनरायझर्स हैदराबादचा मेंटर आहे. विशेष म्हणजे परस्पर हितसंबंध जपल्याबद्दलचे यंदाचे हे तिसरे प्रकरण समोर आले आहे. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तो बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष, सीएसी सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार अशा तीन भूमिकेत होता. यासाठी गांगुलीला निवृत्त न्यायाधिश जैन यांच्यापुढे सनावणीसाठी उपस्थित रहावे लागले होते.जैन यांनी सचिन व लक्ष्मण यांच्याकडून २८ एप्रिलपर्यंत लेखी स्पष्टीकरण मागितले असून बीसीसीआयकडूनही स्पष्टीकरण मागवले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार दिली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, सचिन व लक्ष्मण यांनी दिलेल्या मुदतीमध्ये आपली बाजू मांडली नाही, तर त्यांना त्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही, असेही लोकपालांनी स्पष्ट केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- नोटिस पाठवून लोकपालांनी दिले सचिनला ‘बर्थ डे गिफ्ट’
नोटिस पाठवून लोकपालांनी दिले सचिनला ‘बर्थ डे गिफ्ट’
व्हीव्हीएस लक्ष्मणलाही नोटिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 03:14 IST