मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर तेंडुलकर त्याचा खास मित्रांना भेटला आणि त्यांच्यासोबत दिवाळीचं अनोखं सेलिब्रेशन केलं. तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली आणि दक्षिण आफ्रिकेचा जाँटी रोड्स यांच्यासोबत हे सेलिब्रेशन केलं. त्याने तो व्हिडीओ शेअर केला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यतील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत धडाकेबाज शतकी खेळी करणाऱ्या
रोहित शर्मानेही मुंबईतल्या घरी दिवाळी साजरी केली. तिसरी ट्वेंटी-20 सामना रविवारी होणार आहे. त्यामुळे विश्रांतीच्या काळात रोहित घरी परतला. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचवेळी त्याने सर्वांना सल्लाही दिला आहे.