Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरचा मुलगा भारतीय संघात

आपल्या वडिलासारखी कामगिरी अर्जुनला करता येते का, याकडे चाहत्यांच लक्ष असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 19:32 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आता आपल्या वडिलासारखी कामगिरी अर्जुनला करता येते का, याकडे चाहत्यांच लक्ष असेल.

अर्जुन हा वेगवान गोलंदाज आहे, त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. भारताचा 19-वर्षांखालील संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन चार-दिवसीय सामने आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. हा दौरा जुलै महिन्यात होणार आहे.

 

भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंचे एक शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरानंतर काही सामनेही खेळवण्यात आले होते. या सामन्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताचा संघ निवडण्यात आला आहे.

टॅग्स :सचिन तेंडूलकरअर्जुन तेंडुलकरक्रिकेटश्रीलंका