"बापाचा पैसा वाया घालवतेस"; असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर भडकली सारा तेंडुलकर, म्हणाली..

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा ही सोशल मीडियावर फेमस व्यक्तींपैकी एक आहे, हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 07:30 IST2021-04-17T07:30:00+5:302021-04-17T07:30:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sachin Tendulkar's daughter Sara hits back at troll who accused her of ‘wasting father’s money’ - See post | "बापाचा पैसा वाया घालवतेस"; असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर भडकली सारा तेंडुलकर, म्हणाली..

"बापाचा पैसा वाया घालवतेस"; असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर भडकली सारा तेंडुलकर, म्हणाली..

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा ही सोशल मीडियावर फेमस व्यक्तींपैकी एक आहे, हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही. १२ ऑक्टोबर १९९७साली सचिन व अंजलीच्या घरी सारा जन्माला आली. २३ वर्षीय साराचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. भाऊ अर्जुन तेंडुलकरवरून तिला अनेकदा ट्रोलही केलं गेलं आहे. तसेच भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्यासोबतच्या तिच्या प्रेमाच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. अशात सारानं कधीच कोणत्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु शुक्रवारी तिनं ट्रोलरला सहज-सोप्या भाषेत सुनावले.

सारानं शुक्रवारी तिच्या इस्टा स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात ती गाडीत प्रवास करताना हातात कॉफीचा कप पकडलेली दिसत आहे. यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. बापाचा पैसा वाया घालवतेस, अशी टीका केली. सारानं ट्रोलर्सचा स्क्रीनशॉट शेअर करून सडेतोड उत्तर दिले. कॉफी खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करणे, यात चुकीचे काय आहे. याला तुम्ही पैसा वाया घालवणे म्हणूच शकत नाही.  

 तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, सारानं लिहिली पोस्ट...

आयपीएल २०२१साठी अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होताच बहीण सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) हीनं सोशल मीडियावरून त्याचे अभिनंदन केलं. सारानं इंस्टा अकाऊंटवरील स्टोरीत अर्जुनसोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिलं की,''हे यश तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझंच आहे. मला तुझा अभिमान वाटतो.'' 

 

Web Title: Sachin Tendulkar's daughter Sara hits back at troll who accused her of ‘wasting father’s money’ - See post