Join us

सचिन तेंडुलकरनेही दिल्या चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सचिनने ट्विटरद्वारे चहलला शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 17:16 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा युवा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा आज 27वा वाढदिवस. हा वाढदिवस त्याच्यासाठी खास असाच ठरला आहे.

नवी दिल्ली : भारताचा युवा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा आज 27वा वाढदिवस. हा वाढदिवस त्याच्यासाठी खास असाच ठरला आहे. कारण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे त्या भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने.

सचिनने ट्विटरद्वारे चहलला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये सचिन म्हणाला की, " युझी चहल, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आतापर्यंत तू दमदार कामगिरी केली आहे. यापुढेही तुझ्याकडून दमदार कामगिरी आम्हाला पाहायला मिळो. आयुष्यात तुला जे काही हवं आहे ते तुला मिळावं. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. " 

टॅग्स :सचिन तेंडूलकरयुजवेंद्र चहल