Join us

... तर विराटबरोबर शॅम्पेन पिऊन सेलिब्रेशन करीन- सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून विराट कोहलीला खास भेट मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 07:45 IST

Open in App

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने जर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड तोडला तर त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून खास भेट मिळणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलरकरच्या नावे असलेला 49 शतकांचा रेकॉर्ड विराटने मोडला तर सचिन विराटबरोबर शॅम्पेन पिऊन तो आनंद साजरा करणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सचिनने ही ग्वाही दिली आहे. 'एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम विराटने मागे टाकला. तर तो आनंद त्याच्याबरोबर शॅम्पेन पिऊन साजरा करीन, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं. 

'तुझा एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा विक्रम विराट कोहलीने मोडला तर त्याला तू 50 शॅम्पेनच्या बाटल्या भेट म्हणून देशील का?'असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला होता. त्यावर सचिन म्हणाला, 'मी विराटला अजिबात 50 शॅम्पेनच्या बाटल्या भेट देणार नाही. शॅम्पेनची एक बाटली मी स्वतः त्याच्याकडे घेऊन जाईन व त्याच्याबरोबर शॅम्पेन पिऊन हा आनंद साजरा करीन'. विराटच्या खात्यावर सध्या ३५ एकदिवसीय शतकं जमा आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत सचिनचा विक्रम विराट मोडू शकतो. यावरच सचिनला प्रश्न विचारण्यात आला. 

क्रिकेटमधील करिअर सचिन तेंडुलकरचे सामने पाहूनच घडल आहे, असं विराट नेहमीच बोलतो. 2008मध्ये टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पाऊल ठेवल्यापासूनच विराट व सचिन दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे.  

टॅग्स :सचिन तेंडूलकरविराट कोहलीक्रिकेट