अर्जुन-सनियाची लग्नाआधीच्या कार्यक्रमातील खास झलक! तेंडुलकर कुटुंबियांचा शाही थाट चर्चेत (VIDEO)

तेंडुलकर कुटुंबियांचा शाही अंदाज पाहायला मिळाला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:15 IST2026-03-04T12:10:03+5:302026-03-04T12:15:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sachin Tendulkar Wife Anjali And Daughter Sara Look All Decked Up In Arjun Tendulkar And Saaniya Chandhok Mehendi Ceremony Video Viral | अर्जुन-सनियाची लग्नाआधीच्या कार्यक्रमातील खास झलक! तेंडुलकर कुटुंबियांचा शाही थाट चर्चेत (VIDEO)

अर्जुन-सनियाची लग्नाआधीच्या कार्यक्रमातील खास झलक! तेंडुलकर कुटुंबियांचा शाही थाट चर्चेत (VIDEO)

Arjun Tendulkar-Saaniya Chandh Mehendi And Sangeet Ceremony : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंकोड ही जोडी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याआधी अर्जुन आणि सानिया यांच्या मेहंदी आणि संगीत समारंभातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात तेंडुलकर कुटुंबियांचा शाही थाट पाहायला मिळाला. 

अर्जुन आणि सानिया यांच्या मेहंदी आणि संगीत समारंभाच्या कार्यक्रमासाठी अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंडळींनी हजेरी लावल्याचेही पाहायला मिळाले.  माजी क्रिकेटर हरभजन सिंग आणि त्याची गीताा बसरा ही जोडीनं देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत त्यात सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्यासह अर्जुनसोबत सानियाच्या कुटुंबियातील सदस्यही दिसत आहेत. तेंडुलकर-चंडोक फॅमिलीची खास झलक दाखवणारी फ्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हरभजन सिंग पत्नी गीता बसरा जोडीनं खास लूकसह लुटली मैफील 

रवी शास्त्रींनी लावली होती हजेरी, इथं पाहा व्हिडिओ

अर्जुन-सानियाचं लग्न कधी? 

अर्जुन आणि सानिया चंडोक ही जोडी ५ मार्चला लग्न बंधनात अडकणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या विवाह समारंभासाठी हजारी लावणारआहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने संपूर्ण कुटुंबियासह पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या लेकाच्या लग्नाला निमंत्रित केल्याचे पाहायला मिळाले होते. 

अर्जुनच्या आयुष्यातील नव्या इनिंगसंदर्भातील खास गोष्ट शेअर करताना सचिन तेंडुलकर म्हणाला होता की, "जेव्हा मुलगा एखाद्या मुलीला घरी ओळख करून देण्यासाठी आणतो, तेव्हा कळतं की तो मोठा झाला आहे. अर्जुन तुला अशी व्यक्ती मिळाली आहे जी तुझ्यावर तितकंच प्रेम करते, जितकं तू तिच्यावर करतोस.” या खास शब्दांत सचिन तेंडुलकर याने लेकासह सूनबाईसंदर्भातील खास गोष्ट बोलून दाखवली होती. 

Web Title : अर्जुन तेंदुलकर के प्री-वेडिंग सेलिब्रेशन: तेंदुलकर परिवार का शाही अंदाज!

Web Summary : अर्जुन तेंदुलकर और सानिया चंडोक के प्री-वेडिंग उत्सव चर्चा में हैं। सचिन, अंजलि और सारा सहित तेंदुलकर परिवार का भव्य जश्न सबका ध्यान खींच रहा है क्योंकि जोड़ा 5 मार्च को शादी के बंधन में बंधने की तैयारी कर रहा है। सचिन ने अर्जुन को प्यार मिलने पर दिल की बात कही।

Web Title : Arjun Tendulkar's pre-wedding celebrations: Tendulkar family's royal style in spotlight!

Web Summary : Arjun Tendulkar and Saaniya Chandhok's pre-wedding festivities are creating buzz. The Tendulkar family's grand celebrations, including Sachin, Anjali, and Sara, are capturing attention as the couple prepares to tie the knot on March 5th. Sachin shared heartfelt words about Arjun finding love.