सचिन तेंडुलकरने 'या' कट्टर क्रिकेट फॅनसोबत पाहिली IPL फायनल

सचिन आयपीएल फायनलवेळी कुठे होता याचा उलगडा आता झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 10:44 IST2018-05-29T10:44:11+5:302018-05-29T10:44:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sachin Tendulkar watched IPL Final with Lata Mangeshkar | सचिन तेंडुलकरने 'या' कट्टर क्रिकेट फॅनसोबत पाहिली IPL फायनल

सचिन तेंडुलकरने 'या' कट्टर क्रिकेट फॅनसोबत पाहिली IPL फायनल

मुंबईः आयपीएल-११ चा अंतिम महासंग्राम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर असतानाही, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं दर्शन न झाल्यानं त्याचे चाहते चकित झाले होते. परंतु, सचिन आयपीएल फायनलवेळी कुठे होता याचा उलगडा आता झालाय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या घरी सपत्निक जाऊन त्यानं चेन्नई-हैदराबादमधील महामुकाबल्याचा आनंद लुटला. 

भारतरत्न लता मंगेशकर कट्टर क्रिकेटप्रेमी आहेत. टीम इंडियाचे सगळे महत्त्वाचे सामने त्या न चुकता पाहतात. सचिन तेंडुलकरवर तर त्यांचं विशेष प्रेम आहे. सचिनची फलंदाजी, त्याचा नम्रपणा याचं लतादीदींनी अनेकदा कौतुक केलंय, त्याची पाठ थोपटलीय. सचिनही लतादीदींना आईसमान मानतो. या दोन 'भारतरत्नां'ची रविवारी भेट झाली. निमित्त होतं, आयपीएलचा अंतिम सामना. 

'सचिन तेंडुलकर आणि अंजली बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी आले होते. आयपीएलचा अंतिम सामना आम्ही सगळ्यांनी एकत्र पाहिला', असं ट्विट लतादीदींनी केलं आहे. त्यावर लाइक्सचा पाऊस पडलाय.


Web Title: Sachin Tendulkar watched IPL Final with Lata Mangeshkar