"मला दिलेली पहिली बॅट...", सचिनचा काश्मीर दौरा; तेंडुलकरने आठवणींना दिला उजाळा

सचिन तेंडुलकरने बॅट बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 06:08 PM2024-02-21T18:08:13+5:302024-02-21T18:10:32+5:30

whatsapp join usJoin us
 Sachin Tendulkar visits bat factory in Kashmir with wife Anjali and daughter Sara Tendulkar  | "मला दिलेली पहिली बॅट...", सचिनचा काश्मीर दौरा; तेंडुलकरने आठवणींना दिला उजाळा

"मला दिलेली पहिली बॅट...", सचिनचा काश्मीर दौरा; तेंडुलकरने आठवणींना दिला उजाळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मास्टर ब्लास्टर, दिग्गज आणि भारतातील क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अलीकडेच दक्षिण काश्मीरमधील चुरसू अवंतीपोरा येथे असलेल्या 'एमजे स्पोर्ट्स' नावाच्या क्रिकेट बॅट निर्मिती कारखान्याला भेट दिली. तेथील व्हिडीओ शेअर करत सचिनने आठवणींना उजाळा दिला आहे. सचिन तेंडुलकरने बॅट बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली. तेंडुलकरने इथे भेट दिल्यानंतर पर्यटकांची एकच गर्दी जमली. श्रीनगर-जम्मू महामार्गावर असलेल्या या दुकानाला बॅट बनवणारा कारखाना म्हणून ओळखले जाते.

सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसह काश्मीर दौऱ्यावर होता. आता तो दिल्लीला परतला असून, त्याने थपोरा येथील प्रसिद्ध केशरच्या दुकानाला भेट दिली आणि काश्मिरी केशर 'कहवा'चा आस्वाद घेतला. सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, मला दिलेली पहिली बॅट माझ्या बहिणीने दिली होती आणि ती काश्मीर 'विलो बॅट' होती. त्यामुळे आता मी इथे आल्यानंतर काश्मीर विलोला भेट दिली.

क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे शतक झळकावणारा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरची ओळख आहे. त्याने कसोटीमध्ये ५१ तर वन डेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. वन डेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत मागील वर्षी विराट कोहलीने सचिनचा विश्वविक्रम मोडला. किंग कोहलीने वन डे विश्वचषकादरम्यान वन डेमधील शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. 

गोलंदाज म्हणूनही सचिनच्या नावावर विक्रम
आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने १९९८ मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने १७ वर्ष २२४ दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० च्या एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४१६ डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण २०१ बळी घेता आले. 

Web Title:  Sachin Tendulkar visits bat factory in Kashmir with wife Anjali and daughter Sara Tendulkar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.