BCCI करणार 'क्रिकेटच्या देवा'चा सन्मान! सचिन तेंडुलकरला दिला जाणार मानाचा पुरस्कार

Sachin Tendulkar, BCCI Awards : सचिनच्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीचा विचार करता दिला जातोय हा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:42 IST2025-01-31T17:35:51+5:302025-01-31T17:42:07+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar to get bcci lifetime achievement award for international career | BCCI करणार 'क्रिकेटच्या देवा'चा सन्मान! सचिन तेंडुलकरला दिला जाणार मानाचा पुरस्कार

BCCI करणार 'क्रिकेटच्या देवा'चा सन्मान! सचिन तेंडुलकरला दिला जाणार मानाचा पुरस्कार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sachin Tendulkar, BCCI Awards : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI लवकरच वार्षिक पुरस्कार समारंभ आयोजित करणार आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवारी, १ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. या सोहळ्याआधी क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, महान भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला बीसीसीआयचा मानाचा सीके नायडू पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलाबीसीसीआय जीवनगौरव पुरस्काराने ( Lifetime Achievement Award ) सन्मानित केले जाणार आहे. शनिवारी मुंबईत होणाऱ्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात त्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाईल.

सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सचिनला आतापर्यंत भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न मिळाला आहे. याशिवाय त्याला अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण अशा विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये त्याला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'नेही गौरविण्यात आले होते. ICC आणि BCCI ने देखील सचिनला अनेक क्रीडा पुरस्कार दिले आहेत. त्यात आता आणखी एक प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडणार आहे.

सचिनची २४ वर्षांची समृद्ध कारकीर्द

सचिन तेंडुलकरने भारतासाठी १ टी-20, २०० कसोटी आणि ४६३ वनडे सामने खेळले. म्हणजेच त्याने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळला. या काळात त्याने कसोटीत विक्रमी १५,९२१ धावा आणि वनडे क्रिकेटमध्ये १८,४२६ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकण्याचा त्याचा विक्रम अद्याप कुणीही मोडू शकलेला नाही. सचिनच्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीचा विचार करता, बीसीसीआयने त्याला जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी कुणाकुणाला मिळाला पुरस्कार?

याआधी, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, लाला अमरनाथ, सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे, केएन प्रभू, हेमू अधिकारी, सुभाष गुप्ते, मन्सूर अली खान पतौडी, बीबी निंबाळकर, चंदू बोर्डे, बीशनसिंग बेदी, ए वेंकटराघवन, ईएस प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर, मोहिंदर अमरनाथ, सलीम दुराणी, अजित वाडेकर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, राजिंदर गोयल, पद्माकर शिवलकर, के श्रीकांत आणि फारुख इंजिनियर यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: Sachin Tendulkar to get bcci lifetime achievement award for international career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.