मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा क्रिकेट विश्वात दबदबा होता. पण ते निवृत्त झाल्यावर त्यांची जागी कोण घेणार, यावर बरीच चर्चा झाली. पण त्यानंतर सचिन तेंडुलकर नावाचा तारा क्रिकेट विश्वाच्या नभांगणात उगवला आणि त्याने सारे जग व्यापले. सचिनने गावस्कर यांना आजच्याच दिवशी एका गोष्टीमध्ये मागे टाकत नवीन विश्वविक्रम रचला होता.
दिवस होता १० डिसेंबर २०१५. या दिवशी भारताचा कसोटी सामना श्रीलंकेबरोबर खेळवला गेला होता. या सामन्यात भारताची बिकट अवस्था होती. पण सचिनने खेळपट्टीवर ठाण मांडला आणि दमदार खेळी साकारत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
![]()
सचिनने पाकिस्तानमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीला १९८९ साली सुरुवात केली. यावेळी सचिनचे वय १६ वर्षे आणि २०५ दिवस होते. या दौऱ्यात सचिनला जबर दुखापत मैदानातच झाली होती. पण तरीही त्याने मैदान सोडले नव्हते. या दौऱ्यात सचिनला शतक झळकावता आले नसले तरी त्यानंतर त्याने शतकांचे अर्धशतक पूर्ण केले.
![Image result for sachin tendulkar century in test in lokmat]()
श्रीलंकेविरुद्धच्या दिल्ली येथे झालेल्या या सामन्यात सचिनने ३५वे शतक झळकावले होते. दोन्ही संघांतील तो एकमेव शतकवीर होता. त्याचबरोबर हे शतक पूर्ण करत असताना त्याने गावस्कर यांचा ३४ कसोटी शतकांचा विक्रम मागे सोडला होता. त्याचवेळी क्रिकेट विश्वात सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम सचिनने आपल्या नावावर केला आणि आजगतागायत तो विश्वविक्रम अबाधित आहे. सचिनच्या नावावर ५१ कसोटी शतके आहेत. आजपर्यंत एकाही क्रिकेटपटूला शतकांचा हा एव्हरेट सर करता आलेला नाही.
Web Title: Sachin Tendulkar surpasses Sunil Gavaskar on this day, a world record was created
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.