Arjun Tendulkar And Saaniya Chandhok's Wedding : क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अर्जुन-सानिया ही जोडी ५ मार्चला लग्नबंधनात अडकली. मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये शाही थाटात लग्न सोहळा पार पडला. क्रिकेट, उद्योगजगत, राजकारण आणि बॉलिवूडमधील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी या लग्न समारंभात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
लग्नाला या दिग्गज क्रिकेटर्संनी लावली होती हजेरी
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि अनिल कुंबळे हे दिग्गज लग्न सोहळ्यासाठी पोहचल्याचे फोटो समोर येत असताना माजी क्रिकेटर सुरेश रैना याने अर्जुन तेंडुलकर आणि सानियासह तेंडुलकर कुटुंबियांसोबतचा लग्न मंडपातील खास फोटो शेअर केला. अर्जुन-सानियाला आयुष्याची नव्या इनिंगसाठी शुभेच्छा देणाऱ्या या फोटोत अर्जुन सानिया जोडीची लग्नातील पहिली झलक समोर आली.
अर्जुन-सानियाचा लूक
अर्जुन आणि सानिया दोघांनी लग्नासाठी लाल रंगातील आउटफिटला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. अर्जुन याने लग्नात लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तेंडुलकरांची सून सानिया हिने लाल रंगातील साडीसह अगदी परफेक्ट वेडिंग लूक परिपूर्ण केला होता. लेकाच्या लग्नात सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनीही पारंपारिक अंदाजतील खास लूकनं लक्षवेधून घेतले.
Web Summary : Arjun Tendulkar, son of Sachin, married Saaniya Chandhok on March 5th. Many stars attended the wedding. Suresh Raina shared a photo with the couple, congratulating them on their new innings.
Web Summary : सचिन के बेटे अर्जुन तेंदुलकर ने 5 मार्च को सानिया चांडोक से शादी कर ली। शादी में कई सितारे शामिल हुए। सुरेश रैना ने जोड़े के साथ एक तस्वीर साझा करते हुए उन्हें नई पारी की बधाई दी।