Join us

सचिन तेंडुलकरने या पाच दिग्गज खेळाडूंच्या योगदानाला केला सलाम

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केवळ ध्यानचंद नव्हे तर क्रीडा क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या आणि त्यासाठी अनेक त्याग देणाऱ्या पाच दिग्गज भारतीय खेळाडूंचे विशेष आभार मानले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 08:47 IST

Open in App

मुंबई - २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. बुधवारी अनेक मान्यवरांनी ध्यानचंद यांना मानवंदना वाहिली. पण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केवळ ध्यानचंद नव्हे तर क्रीडा क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या आणि त्यासाठी अनेक त्याग देणाऱ्या पाच दिग्गज भारतीय खेळाडूंचे विशेष आभार मानले. 

भारतरत्न सचिन तेंडुलकर हेही महान खेळाडू आहेत आणि भारतीय क्रीडा क्षेत्रात त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. पण राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने तेंडुलकरने ध्यानचंद, सुनील गावस्कर, प्रकाश पदुकोन, पी. टी. उषा आणि विजय अमृतरात या दिग्गजांचे विशेष आभार मानले. पाहा तेंडुलकरने काय ट्विट केले ते... 

टॅग्स :सचिन तेंडुलकरसुनील गावसकरक्रिकेट