Join us
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळेतून सचिन तेंडूलकर थेट गोव्याला पोहोचला; तुमच्या ओळखीचे दोन मित्र त्याची वाट पाहत होते

'गोव्यात दिल चाहता है चा क्षण, तुमच्या मते आकाश, समीर आणि सिड कोण आहेत?' असा प्रश्न सचिनने चाहत्यांना विचारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 11:42 IST

Open in App

काही दिवसांपूर्वीच धड्यातला मास्टर ब्लास्टर प्रत्यक्षात पाहून चंद्रपूरच्या झेडपी शाळेतील विद्यार्थी भारावले होते. त्याला काही दिवस होत नाही तोच सचिन तेंडूलकर थेट गोव्यात प्रकटला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सचिन तेंडूलकर महाराष्ट्रभर फिरत आहे. असाच तो आता गोव्याला गेला आहे. या ठिकाणी आधीपासून तुमच्या आमच्या सर्वांच्या ओळखीचे त्याचे एकेकाळचे दोन सहकारी वाट पाहत होते. 

सचिनने या दोघांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने दिल चाहता है ची कॅप्शन दिली आहे. सचिनने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे आणि सिक्सरांचा बादशाहा युवराज सिंग आहेत. 

अनिल कुंबळे तिघांचा सेल्फी घेत असतानाचा हा फोटो आहे. 'गोव्यात दिल चाहता है चा क्षण, तुमच्या मते आकाश, समीर आणि सिड कोण आहेत?' असा प्रश्न सचिनने चाहत्यांना विचारला आहे. या फोटोला आतापर्यंत दहा लाखांवर लाईक मिळाले आहेत. या तिघांबद्दल तुम्हाला काय सांगावे? कुंबळे तर तुम्हाला माहिती आहेच... सचिनही. युवराज आणि सचिनने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये मुख्य भुमिका बजावली होती. याच वर्ल्डकपमध्ये सचिनचे स्वप्न पूर्ण झाले होते. युवराज त्याच वर्ल्डकपमध्ये 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' होता. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरअनिल कुंबळेयुवराज सिंग
Open in App