Join us

सचिन तेंडुलकरनं टेनिस स्टार रॉजर फेडररकडे मागितला सल्ला; पाहा Video

सचिन आणि टेनिस स्टार फेडरर यांची मैत्री जगजाहीर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 11:02 IST

Open in App

लॉकडाऊनच्या काळात सचिन तेंडुलकरसह बरेच क्रिकेटपटू आपापल्या घरीच अडकले आहेत. पण, शुक्रवारी तेंडुलकर टेनिस कोर्टवर आपल्या मित्रांसोबत खेळताना दिसला. त्यानं टेनिस खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मुंबईतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तो मित्रांसोबत टेनिस खेळत होता. सचिननं हा व्हिडीओ पोस्ट करताना तो रॉजर फेडररला टॅग केला आणि त्याच्याकडून सल्ला मागितला.

दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर

सचिन आणि टेनिस स्टार फेडरर यांची मैत्री जगजाहीर आहे. फेडररचा सामना पाहण्यासाठी सचिननं अनेकदा टेनिस कोर्टवर हजेरी लावलेली पाहायला मिळाली आहे. फेडररचा आपण चाहता असल्याचेही सचिननं अनेकदा कबुल केलं आहे. त्यामुळे सचिननं या व्हिडीओत फेडररला टॅग केले. या व्हिडीओत सचिन फोरहँड फटका मारताना दिसतोय आणि सचिननं या फोरहँडबद्दल फेडररला काही टीप्स देशील का, असा प्रश्न विचारला. 

पाहा व्हिडीओ..  दोन वर्षांपूर्वी विम्बल्डन स्पर्धेदरम्यान फेडरर आणि सचिनची भेट झाली होती. या दोघांमध्ये अनेकदा सोशल मीडियावर संवाद रंगलेला पाहायला मिळाला आहे.  

टॅग्स :सचिन तेंडुलकररॉजर फेडरर