Join us

सचिन तेंडुलकरने सांगितला २०११च्या वर्ल्ड कपमधील २१ बॅट्सचा किस्सा! नसेल माहित तर नक्की वाचा...  

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने सचिन तेंडुलकरला वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी जागतिक राजदूत म्हणून घोषित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:18 IST

Open in App

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारताचा महान खेळाडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरलावन डे वर्ल्ड कप २०२३ साठी जागतिक राजदूत ( Global Ambassador ) म्हणून घोषित केले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील उद्घाटन सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप ट्रॉफीसह आला आणि स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा केली. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात सचिनने गेस्ट कॉमेंटेटर म्हणून उपस्थितीही लावली अन् तेथे त्याने २१ बॅट्सचा मजेशीर किस्सा सांगितला.

World Cup ENG vs NZ Live : जो रूटने किवी गोलंदाजांना 'वेड' लावलं; ट्रेंट बोल्टला षटकार असा खेचला की... Video

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावणारा जगातील एकमेव फलंदाज असलेल्या सचिनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दित अनेक विक्रम मोडली. भारताकडून २०० कसोटी खेळणारा तो पहिला फलंदाज आहे आणि त्याने त्यात ५३.७८च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. ५१ शतकं व ६८ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने ४६३ सामन्यांत ४९ शतकं व ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा सचिननेच केल्या आहेत. २०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. ( ENG vs NZ Live Scorecard ) २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आठवणीला त्याने आज उजाळा दिला. तो म्हणाला, मी अहमदाबादमध्ये शेवटचा २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या ( वि. ऑस्ट्रेलिया) लढतीत खेळलो. तो सामना स्मरणीय होता. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान मी २१ बॅट्स घेऊन फिरलो आणि त्या २१ बॅट्सपैकी मी मला केवळ एकच बॅट आवडायची आणि त्यानेच मी खेळलो. मी ती बॅट रूममध्ये घेऊन जायचो आणि रिपेअर करायचो. असं मी दोन वर्ष ती बॅट वापरली.''

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपसचिन तेंडुलकरऑफ द फिल्ड