Sachin Tendulkar Gudi Padwa 2026 Celebration : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मराठी नव वर्षातील पहिला वहिला सण अगदी मराठमोळ्या थाटात साजरा केला. पारंपारिक वेशभुषा आणि मायबोलीत चाहत्यांना दिलेल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छांसह क्रिकेटच्या देवानं पत्नीसह आईचा आशीर्वाद घेत पंरपरेसह संस्कार जपण्याचा खास संदेश दिल्याचे पाहायला मिळाले. सचिनने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट सर्वांचे लक्षवेधून घेणारी ठरते. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भात सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन तेंडुलकरनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसली ही खास गोष्ट
सचिन तेंडुलकरने त्याच्या राहत्या घरी गुढी उभारत मराठी बाणा आणि परंपरा जपली. सचिनने पत्नी अंजलीसह गुढी उभारली. त्यानंतर दोघांनीही आईचा आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नव्हे तर सचिन आपल्या लाडक्या श्वानालाही आईच्या पाया पडण्याच्या सूचना करताना दिसून आले. या खास क्षणामुळे हा व्हिडिओ अधिक लक्षवेधी ठरताना दिसत आहे. "तुम्हाला व कुटुबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…हे नववर्ष, आनंद, सुख, समृध्दीचे जावो, हीच प्रार्थना." अशा मराठीतील कॅप्शनसह सचिनने आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिनेश-दीपिकाला कन्यारत्न! क्रिकेटरनं खास पोस्टच्या माध्यमातून शेअर केली 'गूडन्यूज'
सचिन-अंजलीचा लूक अन् घराची सजावट
सचिन तेंडुलकर हा अनेकदा पारंंपारिक कपड्यांमधील खास लूक दाखवून देताना दिसले आहे. मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातील त्याचा मराठमोळा अंदाज चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. आता गुढीपाडव्याच्या दिवशी पुन्हा एकदा त्याची खास झलक पाहायला मिळाली आहे. हलका मोहरी (मस्टर्ड येलो) रंगाचा कुर्ता आणि फिकट बेज-क्रीम रंगाचा पायजमा यासह पारंपरिक पेहरावाला पसंती दिली. कुर्त्यावर सोनेरी छटांमुळे सणासुदीचा आणि मराठमोळा एलिगंट लूक एकदम खास दिसतो. क्रिकेटरची पत्नी अंजली तेंडुलकरने गडद नारंगी आउटफिट्सला पसंती दिली असून लाल बिंदी, साधे दागिने आणि नैसर्गिक मेकअपसह पारंपारिक लूक परिपूर्ण केल्याचे दिसते. गुढीभोवती फुलांची रांगोळी आणि घराला बांधलेले तोरण ही सजावटही आकर्षक दिसते.
Web Summary : Sachin Tendulkar and Anjali celebrated Gudipadwa in traditional Maharashtrian style, seeking blessings from Sachin's mother. The video shows Sachin encouraging his dog to seek blessings, adding a heartwarming touch. Sachin wished fans a prosperous new year.
Web Summary : सचिन तेंदुलकर और अंजलि ने पारंपरिक महाराष्ट्रीयन अंदाज में गुड़ी पड़वा मनाया और सचिन की मां से आशीर्वाद लिया। वीडियो में सचिन अपने कुत्ते को आशीर्वाद लेने के लिए प्रोत्साहित करते हुए दिख रहे हैं, जो दिल को छू लेने वाला है। सचिन ने प्रशंसकों को नए साल की शुभकामनाएं दीं।