Join us

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धचा सामना जिंकला; रुग्णालयातून घरी परतला

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 19:06 IST

Open in App

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सचिन पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. आता कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन तो आज रुगणालयातून घरी परतला आहे. राहत्या घरी तो विलगीकरणात राहणार आहे. (Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona)

सचिननं कोरोनावर मात करुन घरी परतल्याची माहिती त्याच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. "नुकतंच रुग्णालयातून घरी परतलो. सध्या विलगीकरणात असून आराम करत आहे. सर्व चाहत्यांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठीमी त्यांचे आभार मानतो. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे आभाय व्यक्त करतो", असं ट्विट सचिननं केलं आहे. 

सचिन तेंडुलकर याला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानं स्वत: याबाबतची माहिती ट्विट करुन दिली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर सचिन राहत्या घरीच क्वारंटाइन होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते. पण २ एप्रिल रोजी त्यानं ट्विट करत पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली होती. जगभरातून सचिनसाठी प्रार्थन केल्या जात होत्या. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या