Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीला दिलं एक खास चॅलेंज; आठवड्याभरात पूर्ण केल्यावर मिळणार 'ही' गोष्ट...

आता हे चॅलेंज आहे तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 19:04 IST

Open in App

मुंबई : कोणते ना कोणते चॅलेंज आपण पाहत असतो. पण सध्याच्या घडीला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपला शाळेतील मित्र विनोद कांबळीला एक चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज जर त्याने आठवड्याभरात पूर्ण केले तर त्याला वाट्टेल ते द्यायला सचिन तयार झाला आहे. आता हे चॅलेंज आहे तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल...

हे पाहा काय दिले चॅलेंज...

सचिन आणि गायक सोनू निगम यांनी काही वर्षांपूर्वी एक गाणं तयार केलं होतं. हे गाणं सचिनच्या कारकिर्दीवर आधारीत होतं. या गाण्यामध्ये सचिन कोणाकोणाबरोबर क्रिकेट खेळला आहे, हे दाखवण्यात आले होते. त्याचबरोबर सचिनने कोणते फटके मारले आणि त्याला स्टेडियममध्ये कसा प्रतिसाद मिळायचा हे दाखवण्यात आले आहे.

हे गाणं सोनूबरोबर सचिननेही गायले आहे. या गाण्यामध्ये या दोघांनी रंगत भरली आहे. सचिनने हे पार्श्वगायनामध्ये पदार्पण असेल. कारण यापूर्वी तरी सचिनने कोणताही गाणे गायल्याचे वाटत नाही.

सचिन आणि सोनू यांनी 'क्रिकेटवाली बीट पे' हे गाणं गायलं होतं. या गाण्याला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता हे गाणं गायचं चॅलेंज सचिनने कांबळीला दिले आहे. यासाठी सचिनने त्याला आठवड्याभराची मुदत दिली आहे. या आठवड्याभरात जर कांबळीने हे गाणे व्यवस्थित गायले तर त्याला वाट्टेल ते द्यायला सचिन तयार आहे. सचिनचे हे चॅलेंज आता कांबळीने स्वीकारले असून त्याच्याकडे २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरविनोद कांबळीसोनू निगम