Join us

सचिन तेंडुलकरने दिल्या आपला विक्रम मोडणाऱ्या कोहलीला 'या' खास शुभेच्छा

भारताचा कर्णधार विराट कोहलीने असाच एक विक्रम रचला आहे. हा विक्रम रचताना त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 19:30 IST

Open in App
ठळक मुद्देया विक्रमानंतर सचिननेही विराटचे कौतुक केले आहे. सचिनने ट्विटरच्या माध्यमातून कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असं म्हटलं जातं. क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यंत बरेच विक्रम मोडीत निघून नव्याने प्रस्थापित झाले आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीने असाच एक विक्रम रचला आहे. हा विक्रम रचताना त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकलं आहे. या विक्रमानंतर सचिननेही विराटचे कौतुक केले आहे. सचिनने ट्विटरच्या माध्यमातून कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोहलीने  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. कोहलीने 9 हजार ते दहा हजार हा पल्ला फक्त अकरा डावांमध्ये गाठला आहे. कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 धावांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे. सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता क्रिकेट विश्वामध्ये कोहलीने मिळवला आहे.

सचिनने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, " दहा हजार धावांचा टप्पा गाठल्याबद्दल तुझे अभिनंदन. तुझ्या फलंदाजीतील सातत्य हे कमालीचे आहे. यापुढेही तुझ्याकडून अशाच धावा होत राहोत. " 

हे पाहा सचिन तेंडुलकरचे ट्विट

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध वेस्ट इंडिज