Join us

महादान; सचिन तेंडुलकरची आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत; 2000 मुलांना होणार फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा तेंडुलकर सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 14, 2020 11:12 IST

Open in App

महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत केली आहे आणि वंचित कुटुंबातील 2000 मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा तेंडुलकर सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. याआधीही त्यानं अधिक समाजकार्यात सहभाग घेतला आणि स्वतः आर्थिक मदतही केली. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. आसामच्या चॅरिटेबल हॉस्पिटलला तेंडुलकरनं मेडिकल उपकरणं दान केलं आहेत. 

आसाममधील करिमगंज जिल्ह्यातील माकुंडा हॉस्पिटलमध्ये मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी लागणारी उपकरणं त्यानं दान केली आहेत. नवजात बालकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. माकुंडा हॉस्पिटलचे बाल विशेषज्ञ सर्जन डॉ विजय आनंद इस्माइल यांनी सचिनचे आभार मानले. त्यांनी सांगितले की,''सचिन तेंडुलकर आणि एकम या सेवाभावी संस्थेच्या मदतीने हॉस्पिटलला मोलाची मदत झाली आहे. यामुळे गरीब लोकांना कमी पैशांमध्ये चांगला सुविधा मिळू शकतील.''

तेंडुलकर हा UNICEFचा गुडविल अॅम्बेसिडर आहे. याशिवाय तेंडुलकरचे फाऊंडेशन मध्य प्रदेशातील आदीवासींना पोषक आहार व शिक्षण पुरवण्याचे काम करते. तसेच उत्तर-पूर्व भागातील अनेक वंचित भागांमध्ये ही फाऊंडेशन काम करते.     

टॅग्स :सचिन तेंडुलकरआसाम