मुंबई : निवृत्तीच्या पाच वर्षांनंतरही महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मोहिनी चाहत्यांवर अजूनही कायम आहे. क्रिकेटच्या देवाला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची अनेकांनी इच्छाही प्रकट केली आहे. 100MB यांनी ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांना त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याची आस लागली आहे. त्यात तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी यानेही एक पोस्ट करून भर घातली.
'आकाशात किंवा समुद्रात... तो देव आहे, तो कुठेही खेळू शकतो,' अशी पोस्ट कांबळीने केली.
तीन तासाच्या सस्पेंसनंतर तेंडुलकरने त्या ट्विटमागचे रहस्य उलगडले. एका डिजिटल क्विज अॅपच्या मैदानावर आपण पदार्पण करत असल्याची घोषणा तेंडुलकरने केली. त्याचा व्हिडीओही त्याने अपलोड केला आणि या मैदानावरही यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.